क्राईम, भुसावळ

भुसावळात मोबाईल चोरणारे दोघे ताब्यात

शेअर करा !

2019 2image 10 44 081070000mobilesnatcher ll

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील खानापूर दवाखाना भागातून जात असताना औरंगाबाद येथील एका व्यक्तीचा सॅमसंग कंपनीचा ‘सी ७ प्रो ‘या मॉडेलचा २५,००० रूपयांचा काळ्या रंगाचा मोबाईल दोन मोटारसायकल स्वारांनी जबरीने हिसकावून चोरून नेल्याची घटना आज (दि.१४) घडली.

  • advt tsh 1
  • Online Add I RGB
  • advt atharva hospital

 

बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथील शुभम सुदर्शनलाल जैस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यामाहा कंपनीच्या एफ झेड मोटारसायकलवरून डबलसीट आलेल्या दोन अज्ञात इसमांनी वरील ठिकाणी त्याच्या हातातून जबरीने मोबाईल हिसकावून चोरून नेला.  याप्रकरणी भा.द. वि. कलम-३९२,३४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक देविदास पवार यांना मिळलेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी संशयित आरोपी हर्षल सुनील जाधव (वय-२०) रा. चादमारी चाळ व नितीन संजय निकम (वय-१८) रा.आंबेडकरनगर यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पो.उ.नि. दत्तात्रय गुलिंग व मनोज ठाकरे, पो.हे.कॉ. सुनील जोशी व शंकर पाटील, पो.ना. किशोर महाजन, पो.कॉ. विकास सातदिवे, समाधान पाटील व रविंद्र तायडे यांनी केली. पुढील तपास पो हे का शंकर पाटील करीत आहेत.