राजकीय, राज्य

भाजपाध्यक्ष अमित शाह आज मुंबईत ; युतीच्या जागावाटपचा तिढा सुटणार?

शेअर करा !
amit shah uddhav thakre
 

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यादरम्यान अमित शाह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेत युतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

 

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान व्याख्यान आयोजित करण्यात आला आहे. गोरेगावमधील नेस्को संकुलात अमित शाहांचा हा कार्यक्रम होणार आहे. या दौऱ्यादरम्यान अमित शाह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युतीचा फॉर्म्युला अंतिम झाल्यास आजच अमित शाह यांच्या उपस्थितीत युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.