क्राईम, जळगाव, भडगाव, राजकीय

भडगावात बिअरबारवर भाजप पदाधिकारी भिडले; चार जणांविरुद्ध गुन्हा

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट
maramari
 

जळगाव (प्रतिनिधी) भडगाव शहरातील स्वामी समर्थ नगरमधील एका बिअरबारसमोर भाजप कार्यकर्त्यांनी दारू पिण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा भडगावचे नगरसेवक अमोल नाना पाटील यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन धक्काबुक्की करत त्यांच्या खिशातील ३ हजार रुपये जबरीने काढून घेतल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपी भडगाव तर उर्वरित तीन चाळीसगावचे आहेत. दरम्यान, अमळनेर नंतर पुन्हा एकदा भाजप पदाधिकारी नको त्या कारणामुळे सार्वजनिक ठिकाणी भिडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  • NO GST advt 1
  • linen B

 

या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की , शहरातील चाळीसगाव रस्त्यावरील स्वामी समर्थ नगरमधील सदिच्छा नामक बिअरबारसमोर भाजपचे नगरसेवक अमोल पाटील हे रात्री साधारण दहा वाजेच्या सुमारास उभे होते. त्याचवेळी योगेश पाटील (भडगाव), योगेश अर्जुन गव्हाणे (चाळीसगाव), सोनू बापू अहिरे (चाळीसगाव), अक्षय पिरचंद पाटील (चाळीसगाव) यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु अमोल पाटील यांनी पैसे दिले नकार दिला असता संशयित आरोपींनी अमोल पाटील याच्या अंगावर धावून जात गळा दाबला व जबरदस्तीने खिशातील ३ हजार रुपये काढून घेत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, तुझ्याकडे अजुन पैसे असतील तर काढून दे नाहीतर, तुला जिवे ठार मारू अशी धमकी दिली. यातील गव्हाणे हे भाजप युवा मोर्चाचे चाळीसगाव सरचिटणीस असून उर्वतील दोघे कार्यकर्ते असल्याचे कळते. याप्रकरणी भडगाव पालिकेचे नगरसेवक तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल नाना पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय आनंद पटारे हे करीत आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी भाजप-शिवसेना युतीचा महामेळावा भडगाव शहरात आयोजित करण्यात आलेला होता.

Leave a Comment

Your email address will not be published.