क्राईम, जळगाव

रुग्णालयातून दुचाकी लांबवली

शेअर करा !
bike chori 201895 102842 05 09 2018
 

जळगाव (प्रतिनिधी) रुग्णालयात दाखल असलेल्या पत्नीला डबा देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची दुचाकी चोरीस गेल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याबाबत जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Sulax 1
  • advt tsh flats

 

मिळालेल्या माहितीनुसार विकास मधुकर पाटील (रा. असोदा) यांची पत्नी जिल्हापेठ परिसरातील आरोग्यम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल आहे. 13 ऑगस्ट रोजी गोपाळ नारायण पाटील (रा. असोदा) यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक (एमएच 19 ए यू 8580) ही घेऊन डबा देण्यासाठी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गेले होते. दुचाकी रुग्णालयातील पार्किंगमध्ये लावली. मात्र, सायंकाळी ८.३० वाजेच्या सुमारास दुचाकी जागेवर मिळून न आल्याने विकास पाटील यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, मिळून न आल्याने जिल्हापेठ पोलिसात दुचाकी चोरी गेल्याप्रकरणी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज कोळी हे करीत आहे.