क्राईम, भुसावळ

भुसावळात बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक

शेअर करा !

bhusawal news 2

भुसावळ प्रतिनिधी । येथील भवानी कॉलनीती सहा वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार कारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भवानी नगरातील रहिवासी सहा वर्षिय बालिकेला वडीलांनी चॉकलेट घेण्यासाठी 10 रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दुकानावर पाठविले. दरम्यान ती पाऊन तासानंतर घरी रडत आली. यावेळी आईने तीला विश्‍वासात घेऊन विचारपुस केली असता. तीने एका नराधमाने आपल्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी घटनास्थळावरुन एक व्यक्ति गेल्याने नराधमाने आपल्याला सोडून दिल्याचे बालिकेने आईला सांगितले होते. त्यानंतर संबंधित संशयित माथेफिरु आरोपी परिसरात फिरतांना आढळून आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून बाजारपेठ पोलिसात दाखल केले. याबाबत बालिकेच्या आईच्य फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्ति विरुद्ध भा.दं.वि. ३५४ ए (आय), ३५४ बी, लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण कायदा २०१२ कलम ७, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पो.नि. दिलीप भागवत करित आहे.