भुसावळ, सामाजिक

भुसावळात मोहरम निमित्त मातम मिरवणूक (व्हिडिओ)

शेअर करा !

bhusawal news 1

भुसावळ प्रतिनिधी । येथील इराणी बांधवांतर्फे इमाम हसन हुसेन यांच्यातर्फे मोहरम निमित्त आज १० सप्टेंबर रोजी मातम मिरवणूक काढण्यात आली. यात इराणी समाज बांधवांनी मिरवणुकीत शोकही प्रकट केला.

advt tsh 1

मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाल्याने मातम मिरवणूक काढण्यात आली. खडका रोड भागातील इमामवाडा भागातून सकाळी १० वाजता मातम मिरवणुकीला सुरुवात झाली. खडका रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मॉडर्न रोड, गांधी चौक, बाजारपेठ पोलिस ठाणे, साने गुरूजी चौक, हंबर्डीकर चौक,महात्मा गांधी पुतळा व तेथून तापी नदीवर मातम मिरवणूक दुपारी आल्यानंतर मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी उपविभागीयपोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत,शहरचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व पोलिस कर्मचार्‍यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.