भुसावळ

भुसावळात न्यायाधिशांच्या निवासस्थानांचे भुमीपूजन ( व्हिडीओ )

शेअर करा !

bhusawal bhumipujan

भुसावळ प्रतिनिधी । येथील जामनेर रोड परिसरात न्यायाधिशांच्या निवासस्थानांचे आज भूमिपूजन करण्यात आले आहे.

  • Sulax 1
  • advt tsh flats

भुसावळ येथील न्यायालयातील कामकाजाचा विस्तार झाला असून न्यायाधिशांची संख्यादेखील वाढली आहे. या अनुषंगाने शहरातील जामनेर रोडवर नाहाटा महाविद्यालयाच्या पुढे न्यायाधिशांसाठी निवासस्थाने बांधण्यात येत आहेत. या निवासस्थानांचे भुमिपूजन आज सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.ए. देशपांडे, तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.जी. ठुबे व आर.एन. हिवसे, दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर श्रीमती एस.एन. माने, मुख्य न्याय दंडाधिकारी जळगाव श्रीमती सी.व्ही. पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत न्यायाधिश एम.बी. भन्साळी, आर.आर. भागवत, पी.ए. साबळे, व्ही. जी. चौखंडे, एम.पी. बिहारे यांनी केले.

याप्रसंगी अ‍ॅड. तुषार पाटील, रम्मू पटेल, पी.ई. नेमाडे, राम नेवे, एन.डी. चौधरी, प्रशांत लोणारी, मनीष जुमनानी, सचिन कोष्टी आदींसह बार असोसिएशनचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी आदींची उपस्थिती होती.