भुसावळ, राजकीय, सामाजिक

भुसावळात नगरपरिषदतर्फे वृक्षारोपण (व्हिडीओ)

शेअर करा !

bhusaval vruksharopan

भुसावळ प्रतिनिधी । ग्रीन सिटी बनविण्यासाठी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पुढाकार घेतला असून शहरातील विविध भागांमध्ये नुकतेचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

  • Online Add I RGB
  • advt atharva hospital
  • advt tsh 1

याबाबत माहिती अशी की,  शहरातील फालकनगर प्रभाग क्रमांक 13 मध्ये माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, नगरसेविका माधुरी आवटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते गौरव आवटे यांच्या हस्ते 200 विविध प्रजातींच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी सांगितले की, विविध भागांमध्ये आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात येत आले. शहरातील विविध भागांमध्ये सुमारे 10 हजार वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नगरपरीषदेचा भुसावळ शहर सुंदर व ग्रीन सिटी बनविण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.