क्रीडा, राज्य, राष्ट्रीय

भारतीय संघाला बुकींकडून सर्वाधिक पसंती

शेअर करा !

1 india 11

लंडन वृत्तसंस्था । वर्ल्ड कपमधील पहिली उपांत्य लढत आज दि. 9 जुलै रोजी होत आहे. यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील. क्रिकेट वर्ल्ड कप आता अंतिम टप्प्यात आला असून, बुकींकडून भारतीय संघालाच सर्वाधिक पसंती मिळाली आहे. भारता पाठोपाठ इंग्लंडचा संघ जिंकू शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

याबाबत माहिती अशी की, भारतीय सलामीवीर रोहित शर्मा या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल, असा ठाम विश्वास बुकींना आहे. त्याला ८/१३ अशी किंमत देण्यात आली आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (११/८) आणि इंग्लंडचा जो रूट (२०/१) यांचा क्रमांक लागतो. याशिवाय, भारतीय कर्णधार विराट कोहलीही (३३/१) पहिल्या पाच फलंदाजांमध्ये असेल, असे बुकींना वाटते. दुसऱ्या उपांत्य लढतीमध्ये यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे. साखळी फेरीमध्ये भारताने 9 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. अंतिम गुणतक्त्यामध्ये १५ गुणांसह भारत पहिल्या क्रमांकावर राहिला, तर १४ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसाने वाहून गेला, तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. उपांत्य फेरीमध्ये न्यूझीलंडवर मात करत भारत अंतिम फेरीत जाईल आणि त्या सामन्यातही भारताचा विजय होईल, असा विश्वास बेटिंग करणाऱ्या इंग्लंडमधील वेबसाइटनी व्यक्त केला आहे. ‘लॅडब्रोक्स’ या वेबसाइटवर भारताच्या विश्वविजेतेपदाची १३/८ अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर इंग्लंड (१५/८), ऑस्ट्रेलिया (११/४) आणि न्यूझीलंड (८/१) अशी किंमत देण्यात येत आहे. तर, ‘बेटवे’ या वेबसाइटवर भारताला २.८ अशी किंमत आहे. त्यानंतर इंग्लंड (३), ऑस्ट्रेलिया (३.८) आणि न्यूझीलंड (९.५) अशीच क्रमवारी आहे.