क्राईम, जळगाव

भरधाव वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार

शेअर करा !

mamurabad new

जळगाव प्रतिनिधी । जळगावहून बाजार करून विदगावला परतत दुचाकीने जात असतांना मागून येणाऱ्या महिद्रा पिकअप वाहनाने उडविल्याने 40 वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची घटना ममुराबाद महाविद्यालयाजवळ दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे विदगावात हळहळ व्यक्त होत आहे.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

याबाबत माहिती अशी की, संजय पंढरी कोळी हे बाजार करण्यासाठी जळगावात आले होते. बाजार केल्यानंतर ते आपली टीव्हीएस स्टार सिटी दुचाकीने (क्र. एमएच- १९, २९९५) विदगावला घरी परतत होते. मात्र, ममुराबाद मेडिकल कॉलेजजवळ या मोटारसायकलला महेंद्रा पिकअपने (क्र. एमएच- १९, डीएम- ३७४५ ) मागून जोरदार धडक दिली. यात संजय कोळी यांच्या मागे बसलेल्या शोबाबाई संजय कोळी (वय ४०, रा. विदगाव) ह्या फेकल्या जाऊन त्या जागेवरच मृत झाल्या. संजय कोळी मात्र थोडक्यात बचावले. अपघाताची माहिती कळताच विदगावच्या नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. शोबाबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.