क्रीडा, जळगाव

वर्ल्ड जूनियर अंडर ट्वेंटी मुली चेस चॅम्पियनशिपमध्ये भाग्यश्री आठव्या फेरीत विजयी

शेअर करा !

WhatsApp Image 2019 10 23 at 11.40.28 AM

जळगाव , प्रतिनिधी | दिल्ली येथे हॉटेल लीला अंबियन्समध्ये होत असलेल्या ऑल इंडिया चेस फेडरेशन व दिल्ली चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड जूनियर अंडर २० मुली चेस चॅम्पियनशिपमध्ये भाग्यश्री पाटील हिने आठव्या फेरीत क्युबा देशाची वुमन फिडे मास्टर ऑब्रेगण गार्सिया रॉक्सांगेल हीला पराभूत केले.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

आठव्या फेरी अखेर भाग्यश्रीचे चार विजय एक बरोबरी तीन पराभुत असे साडे चार गुण झाले आहेत. अजून स्पर्धेच्या तीन फेऱ्या बाकी आहेत त्यामुळे स्पर्धेत चुरस निर्माण झाली आहे. भाग्यश्रीने पुढील खेळाडूंना पराभूत केले. मंगोलियाची उल्झिखिशिघर्गल ओचीरखुयाग,साऊथ आफ्रिका ची डू पलसिस, ब्राझिल ची तमारोजी इसबेल,क्युबा ची ऑब्रेगांन गार्सिया.तर चीन ची झांग झियाव सोबत बरोबरी . तर खालील खेळाडूंसोबत तिला हार पत्करावी लागली इराण ची अलीनासाब मोबिना, भारताची हर्शिता गुदांती, ecuador ची ऑर्तिझ व्हर्देझोटो.भाग्यश्री ही पाचोरा गो. से. हायस्कूल व जैन स्पोर्ट अकॅडमी ची दत्तक खेळाडू आहे. भाग्यश्री च्या ह्या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे अतुल जैन यांनी शुभेच्छा पाठविल्या आहेत .