क्राईम, जळगाव

बांभोरी येथे एकाचा आकस्मात मृत्यू

शेअर करा !

Crime

जळगाव प्रतिनिधी। बांभोरी पॉलिटेक्निक कॉलेजच्या आवारात काम 60 वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी सायंकाळी अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. याबाबत जिल्हापेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले.

advt tsh 1

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतिभाताई पाटील पॉलिटेक्निक कॉलेजच्या आवारात एक 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मयत स्थितीत एका खाजगी रिक्षा वाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले होते. आज त्या व्यक्ती ओळख पटली असून अनिल शामराव पाटील वय 60 रा. एरंडोल असे मयताचे नाव असून ते गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिभाताई पॉलिटेक्निक महाविद्यालयात हात मजुरीचे काम करत होते. त्यांचा काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक मृत्यू झाला होता. याबाबत जिल्हापेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.