क्राईम, भुसावळ

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीस अटक

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

aropi news bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपीस भुसावळ पोलीसांना सापळा रचून अटक केली आहे.

  • Online Add I RGB
  • new ad
  • vignaharta
  • advt tsh 1

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख शोहेब शेख अकिल वय-20 रा. पापा नगर ह्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीसात भाग-5 गुरनं 257/2019 प्रमाणे पोक्सो कलम 12 भादवी कलम 452, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी शेख शोहेब हा फरार होता. दरम्यान, आरोपी हा शहरातील रजा टॉवर जवळ आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. गुन्हाचा पुढील तपास पोउनि दत्रायय गुलिंग करीत आहेत.

यांनी केली कारवाई
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दत्रायय गुलिंग, पोहेकॉ सुनील जोशी, पोना किशोर महाजन, पोका विकास सातदिवे, समाधान पाटील यांनी कारवाई केली.