क्राईम, भुसावळ

नगरसेवक खरात यांच्या कुटुंबावर हल्ला; तीन ठार; चार गंभीर

शेअर करा !

bsl murder

भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

येथील नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर आज रात्री पावणेदहाच्या सुमारास हल्ला चढविण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार केला. यात स्वत: रवींद्र खरात, त्यांचे बंधू सुनील खरात आणि मुलगा सागर हे जागीच ठार झाले असून त्यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश आणि अजून एक असे चार जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.