आरोग्य, भुसावळ, सामाजिक

आर्या फाऊंडेशनने राबविला व्यवसनमुक्तीचा उपक्रम

शेअर करा !

Vasani mule

भुसावळ प्रतिनिधी । येथील आर्या फाऊंडेशनतर्फे तालुक्यातील चार व्यसनाधिन झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार करुन त्यांची व्यसनापासून सुटका झाल्याने नवजीवन जगण्याची संधी दिली आहे. संचालिका डॉ.वंदना वाघचौरे यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.

  • Sulax 1
  • advt tsh flats

गेल्या काही महिन्यांपासून डॉ. वंदना वाघचौरे व्यसनमुक्तीचे कार्य करीत आहे. अश्यातच त्यांच्या रुग्णालयात गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी रुग्णालयात आलेल्या 4 गरीब कुटुंबातील रुग्णांवर प्रसांगवधान राखून स्वतः पैसे खर्चून मोफत उपचार केला. उपचाराकरिता दाखल झालेले रुग्ण बरे होउन घरी जात असतांना त्यांचे करीता समारोप समारंभ 21 जून रोजी रात्री 8 वाजता संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष उमेन्द्र वाघचौरे उपाध्यक्ष डॉ.वंदना वाघचौरे, माजी मुख्याध्यापक नारायण गुरचळ, ग्रामसेवक प्रशांत तायडे शांताराम तायडे बापूसाहेब बोरसे, आदी उपस्थित होते.

प्रसंगी व्यसनापासून सर्वांनी दूर राहावे आजकाल तरुण पिढी जास्त व्यसनाच्या आहारी जात आहे. याकरिता पालकांनी आपल्या पाल्यांकडे जातीनेलक्ष द्यावे, त्यांना समजून घ्यावे असे आवाहन डॉ.वंदना वाघचौरे यांनी मनोगतात केले. तसेच रुग्णालयात उपचारार्थ आलेले हे रुग्ण अतिशय गरीब कुटुंब असल्याने आर्या फौंडेशनच्या माध्यमातून त्यांचेवर मोफत उपचार केले. त्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ते सुधारले व त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींचा आनंद हेच आमचे समाधान असल्याची भूमिका स्पष्ट केली.

यानंतर सत्कारार्थी रुग्णांनी व त्यांचे नातेवाईक यांनी नवजीवन व्यसनमुक्ती रुग्णालयामुळे नवजीवन मिळाल्याचा आनंद व्यक्त केला तसेच व्यसनाच्या आहारी गेल्याने या त्रासाचा कसा त्रास झाला जीवनाला कंटाळून जीवन संपवण्याचे अविचार मनात आले परंतु डॉ वंदना यांच्या रुग्णालयात मिळालेल्या सकारात्मक उपचार पद्धतीच्या संजीवनीमुळे नवजीवन मिळाल्याचा आनंद मनोगतातून व्यक्त केला. सूत्रसंचालन एकता तायडे, प्रास्ताविक वैभव राऊत यांनी यशस्वितेकरिता ऋषिकेश साळवी, भाविका निकम, वैशाली सावळे परिश्रम घेतले.