क्राईम, राष्ट्रीय

अमेरिकेच्या साऊथ डकोटात प्रवासी विमानाला भीषण अपघात; नऊ ठार

शेअर करा !

plane 1

चेंबरलेन वृत्तसंस्था । अमेरिकेच्या साऊथ डकोटा येथे एका प्रवासी विमानाला भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. हे विमान शनिवारी रात्रीच्या सुमरास निघाले होते. या अपघातात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. चेंबरलेन येथून उड्डाण करुन हे विमान इदाहो फॉल्सकडे निघाले होते. ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या माहितीनुसार, विमानाच्या उड्डाणापूर्वी चेंबरलेन आणि सेन्ट्रल साऊथ डकोटामध्ये बर्फाच्या वादळाचा इशारा देण्यात आला होता.

  • Sulax 1
  • spot sanction insta
  • advt tsh flats

या अपघाताबाबत माहिती देताना ब्रूल काऊंटीच्या अॅटोर्नी थेरेसा मौल रॉसोव यांनी सांगितले की, मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. जखमी झालेल्या तिघांना सियोक्स फॉल्स येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मात्र, जखमींच्या प्रकृतीबाबत अद्याप कुठलीही माहिती दिली जाऊ शकत नाही. प्रतिकूल हवामानातही घटनास्थळी दाखल होत बचाव कार्यात सहभागी झालेल्यांनी मोठ्या धाडसाने मदत कार्य राबविले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.