राज्य, राष्ट्रीय

आता ‘आरे’मध्ये येताना पाच झाडे घेऊन या – अभिनेता सयाजी शिंदे

शेअर करा !

thakary and shinde

मुंबई वृत्तसंस्था । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयानंतर वृक्षप्रेमी आणि अभिनेता सयाजी शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. तसंच आता “यापुढे ‘आरे’मध्ये येताना निदान पाच झाडं तरी घेऊन या”, असं आवाहन जनतेला केले आहे.

  • spot sanction insta
  • Sulax 1
  • advt tsh flats

पुढचा विचार केला जाईल तोपर्यंत आरे कारशेडमधलं एक पानही तोडता येणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर सर्व स्तरांमधून विविध चर्चा रंगत आहेत. यामध्येच ‘आरे’मध्ये कारशेड व्हावे किंवा होऊ नये, मेट्रो व्हावी की नाही हा निर्णय शासनाचा आहे. पण विकासाच्या नावाखाली झाडं तोडली जाऊ नयेत. उद्धव ठाकरे यांनी आता या पुढे आरे कॉलनीतील एक पानही तोडू देणार नाही, असे विधान केले. त्यांच्या या विधानाचा मी महाराष्ट्रातील वृक्षप्रेमींच्या वतीने स्वागत करतो. आम्ही दर रविवारी आरेमध्ये झाडे लावण्यासाठी जातो. ज्यांना या कामामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांना या पुढे आरे कॉलनीमध्ये येताना निदान पाच झाडं तरी घेऊन या, असे सयाजी शिंदे यांनी सांगितले.

सयाजी शिंदे यांनी प्लास्टिकमुक्त आरे आणि झाडांनीयुक्त आरे करण्याची नवीन मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या या मोहिमेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पुढचा विचार केला जाईल, तोपर्यंत आरे कारशेडमधले एक पानही तोडता येणार नाही अशी मोठी घोषणा केली.