जळगाव, शिक्षण

अनुभूती इंग्लिश मिडीयम सेकंडरी स्कुलला प्रारंभ : भोईटे शाळेचे नूतनीकरण (व्हिडीओ)

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

8b1a77d5 e400 4d9b 8d3a 1e620adfc10b

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील मू.जे. महाविद्यालयाजवळील भोईटे विद्यालयात आता ‘अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल (सेकंडरी)’ ही शाळा सुरू झाली आहे. जैन उद्योग समूहातर्फे या शाळेचे नूतनीकरण करण्यात आले असून आज (दि.११) तिचे लोकार्पण करण्यात आले.

  • advt atharva hospital
  • advt tsh 1
  • new ad
  • vignaharta
  • Online Add I RGB

 

 

या लोकार्पण सोहळ्याला माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, संघपती दलिचंद जैन, गिरधारीलाल ओसवाल, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. सुभाष चौधरी, अनुभूती स्कुलच्या संचालिका निशा जैन, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, माजी महापौर नितीन लढ्ढा, डी.एम. जैन, डॉ. सुनील महाजन, ललित कोल्हे, नितीन बरडे, अनंत जोशी, मंगला चौधरी, गायत्री राणे, प्राचार्या रश्मी लाहोटी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. सध्या अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आठवी ते दहावीचे वर्ग भरणार आहेत. पुढे बारावी पर्यंतची सुविधा केली जाणार आहे.

उद्घाटनपर भाषणात सुरेशदादा जैन यांनी म्हटले की, जैन उद्योग समूहाचे कार्य समाजाभिमुख असून संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी सुसंस्कारीत आणि उच्चशिक्षित पिढी घडविण्यासाठी मार्गदर्शक उपक्रम सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या शाळेला जैन उद्योग समूहाने पुरुज्जीवीत केले आहे. गोर गरीबांची मुले इथे उच्च शिक्षण घेणार आहेत. समाजाला सातत्याने देत राहणे, हा जैन परिवाराचा संस्कार आहे, त्यामुळेच जळगाव शहरात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे, शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सगळ्यांनी जैन उद्योग समुहाच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार सुरेश भोळे यावेळी म्हणाले की, शिक्षण हे सध्या महाग झाले आहे. शहरातील प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी महापालिकेची असते, ते लोकसहभागातून दिले गेले पाहिजे यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यायला हवे. जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून या शाळेचा कायापालट झालेला आहे. येथे संस्कारीत आणि मुल्यवर्धित शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सत्याच्या रस्त्यावर चालायचे, त्या रस्त्यावर गर्दी कमी असते, पण काम केल्याचे समाधान मिळत असल्याची शिकवण भवरलालजी जैन यांनी दिल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे म्हणाले, जैन उद्योग समुहाने महापालिकेचा केलेला कायापालट ही आनंददायी बाब आहे. जागेचा चांगला सदुपयोग होत आहे, याचा शहरातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना फायदा होईल. वीस वर्षांनंतर येथील विद्यार्थी समाजातील आदर्श नागरिक म्हणून पुढे येतील असा आशवाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनोगत व्यक्त केले. तसेच कृष्णा मराठे (९वी), पुजा इथापे (१०वी) या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले तर प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी आभार मानले.