राजकीय, राष्ट्रीय, व्यापार

भाजपाच्या कार्यकाळात अमित शहांच्या पुत्राची संपत्ती १५०० टक्क्यांनी वाढली

शेअर करा !
jay shaha
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रिय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे पूत्र जय शाह यांच्या कंपनीची कमाई भाजपच्या कार्यकाळात एक हजार ५०० टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त ‘द कारवान’ या वेबसाईटने दिले आहे. दरम्यान, २०१४ आणि २०१५ मध्ये कंपनीची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसतानाही २०१६ पासून कंपनीला मोठ्या प्रमाणात क्रेडिटवर मोठी रक्कम देण्यात आल्याचेही वृत्तामध्ये म्हटले आहे.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

 

अलिकडेच बीसीसीआयच्या सचिवपदी निवड झालेल जय शाह यांच्या कुसुम फिनझर्व्ह एलएलपी (Kusum Finserve LLP) या कंपनीची २०१४ मध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर एकूण कमाई ७९ लाख ६० हजार रुपये इतके होते. मागील पाच वर्षांमध्ये या कंपनीची एकूण कमाई ११९ कोटी ६१ लाख रुपये इतकी झाल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे. कुसुम फिनझर्व्ह एलएलपीने कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर माहिती दाखल केली होती. कंपनीने दाखल केलेल्या माहितीच्या आधारे कारवानने कंपनीच्या व्यवसाय वृद्धीचे वृत्त दिले आहे. या कंपनीत जय शाह भागीदार असून, कंपनीच्या संचालक पदाच्या समतुल्य पदावर कार्यरत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर म्हणजेच २०१४ ते २०१९ या आर्थिक वर्षात कुसुम फिनझर्व्ह एलएलपी कंपनीच्या संपत्तीत ११८ कोटी रूपयांहून अधिकची वाढ झाली आहे. या वृत्तामधील माहितीनुसार २०१७ ते २०१८ दरम्यान जय यांच्या कंपनीला आर्थिक व्यवहाराचे तपशील देण्यास सांगण्यात आले तेव्हा या कंपनीची कमाई भरमसाठ वाढल्याचे पहिल्यांदा लक्षात आले होते.