राष्ट्रीय, सामाजिक

‘एैसी चाय जो दुश्मन को भी, दोस्त बनाये’, पाकमधील चहाच्या टपरीवर ‘अभिनंदन’चा फोटो

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

D1delRDX0AA 8I

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) कराचीतील एका चहावाल्याने आपल्या चहाच्या टपरीवर भारतीय हवाईसेनेचा शूरजवान अभिनंदन वर्धमान यांचा फोटो लावला आहे. एवढेच नव्हे तर उर्दु भाषेत संदेश देऊन अभिनंदन यांच्या शौर्याचे कौतुक करत ”एैसी चाय जो दुश्मन को भी, दोस्त बनाये” असा संदेश या चहावाल्याने चहाच्या टपरीवरील फलकात लिहिला आहे. सध्या भारत आणि पाकस्तानमधील सोशल मीडियात हा फोटो आणि मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे.

  • ssbt
  • election advt

 

पाकिस्तानमधील या अनोख्या चहा टपरीवाल्याचा फोटो पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील नागरिकांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. विशेष म्हणजे या फोटोचे कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, 27 फेब्रुवारी रोजी विंग कमांडर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानी सैनिकांसमवेत चहा पिताना दिसून आले. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकला उत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यास, भारताने प्रत्युत्तर देताना, विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या हद्दीत अडकले होते.

Leave a Comment

Your email address will not be published.