क्राईम, यावल

आडगाव दंगल प्रकरणातील 28 जणांना कोठडी

शेअर करा !

law

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव येथे पुर्ववैमनश्येतून बुधवारी रात्री दोन गटात झालेल्या दंगलीतील एका गटाकडील १५ तर दुसऱ्‍या गटाकडील १३ अशा २८ जणांना पोलीसांनी अटक करून शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता १३ जणांना न्यायालयीन कोठडीत तर दुसऱ्‍या गटाकडील १५ जणांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

  • spot sanction insta
  • Sulax 1
  • advt tsh flats

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील आडगाव येथे बुधवारी 13 जून रोजी रात्री दोन गटात झालेल्या दंगलीत एका गटाकडील २६ तर दुसऱ्‍या गटाकडील १९ जण असे एकुण ४५ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी या घटनेतील संशयित एका गटाकडील १५ जण यात, चंद्रकांत पुंडलीक पाटील, सुधीर वामन पाटील, गोकुळ पितांबर पाटील, दीपक सुनील पाटील, अमोल उर्फ वकील भगवान पाटील, गुणवंत शेनफडू बेंडाळे, नितीन भास्कर पाटील, शामकांत रोहिदास पाटील, पवन शशिकांत शिंदे, समाधान सुखदेव पाटील, विशाल प्रभाकर वाणी, मनोहर पुंडलिक पाटील व निलेश संजय पाटील यांना अटक केले असून त्यांना येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याने त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर दुसऱ्‍या गटाकडील जुम्मा सिकंदर तडवी, महेरबान रमजान तडवी, आरिफ सुभान तडवी, मुकद्दर शरीफ तडवी, हुसेन नथु तडवी, नथू रमजान तडवी, सादिक हुसेन तडवी, हमीम जुम्मा तडवी व गुलशेर कालू तडवी, सलिम हसन तडवी, इस्माईल समशेर तडवी, शकील सुभान तडवी, युनूस अकबर तडवी, संजु राजु तडवी व न्याजोद्यीन इस्माईल तडवी यांना न्यायालयाने १८ जुन मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहे.

गावात तणावपुर्ण शांतता
गावात शांतता असून, आडगाव गावात अनुचित प्रकार घडु नये, या करीता डीवायएसपी नरेंद्र पिंगळे हे यावल येथे ठाण मांडून असून सपोनि सुजीत ठाकरे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांनी आपला गावातील बंदोबस्त तैनात केला असून परिस्थितीवर नजर ठेवुन आहे.