क्राईम, जामनेर

शहापूरजवळ डंपरच्या धडकेत दोन जण ठार

शेअर करा !

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील शहापूर येथे डंपरने दिलेल्या जोरदार धडकेत दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहापूर गावाजवळून योगिराज किसन राठोड (वय ३५) व श्याम विष्णू जाधव (रा. घाणेगाव, ता. सोयगाव) हे दोघेजण मोटारसायकलने (क्र. एमएच १९, एक्स २६६५) जामनेरकडे येत होते. दरम्यान, जामनेरकडून फत्तेपूरकडे जाणार्‍या एमएच १५, सीके ३६७४ क्रमांकाच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात योगिराज व शाम या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली.