क्राईम, शिक्षण

एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांचा नागपूर विद्यापीठात राडा; महिलांनाही धक्काबुक्की

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

नागपूर (वृत्तसंस्था) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात चांगलाच राडा केला. या हाणामारीत सुरक्षाबलाच्या जवांनही जखमी झाले असून एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांकडून महिलांनाही धक्कबुक्की केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

  • linen B
  • NO GST advt 1

निवेदन देण्यासाठी काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 30 ते 40 कार्यकर्ते विद्यापीठात दाखल झाले होते. कार्यकर्त्यांनी कुलसचिवांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा बलाच्या जवानांनी त्यांना रोखले असता त्यांनी धुडघूस घालायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी कुलसचिवांच्या कॅबिनच्या काचा फोडल्या. यावेळी सुरक्षा बलाचे जवान योगेश गांगुर्डे यांच्या अंगावर गेट पडल्याने ते जखमी झाले. तर महिला कार्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करत असताना महिला रक्षकाच्या हाताला दुखापत झाली.

Leave a Comment

Your email address will not be published.