जळगाव, राजकीय

आढावा बैठकीत अधिकाऱ्यांच्या कामकाजाविरोधात रोष

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

जळगाव (प्रतिनिधी) व्हॅाल्वमन यांच्या मनमानी पद्धतीने काम करणे, पैसे घेवून पाणी सोडणे, फोन न उचलणे आदी तक्रारींचा पाढा वाचून अशा प्रकारानेच शहरातील अनेक भागात पाणी मिळत नसल्याचा आरोप आज महापौर सीमा भोळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत नगरसेवकांनी केलेत.

  • vignaharta
  • advt atharva hospital
  • new ad
  • Online Add I RGB
  • advt tsh 1

जळगाव शहरातील पाणीपुरवठा,आरोग्य व लाईट विभागाच्या समस्यांबाबत महापालिकेच्या प्रशासकीय १७ माजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील समागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंचावर उपमहापौर अश्विन सोनवणे, उपायुक्त लक्ष्मिकांत कहार, जितेंद्र मराठे, भगत बालाणी, डॉ.सुनिल महाजन उपस्थित होते. या बैठकीत नगरसेवकांनी व्हॉलमन पैसे घेवून पाणी पुरवठा करत असल्याचा आरोप करुन दोन दिवसात पाणी टंचाई संपुष्ठात न आल्यास नगरसेवकांनी आंदोलनाचा इशारा दिला. पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी माहिती देतांना पाणी टंचाई निवारणासाठी ६ व्हॉल्व बसविण्यात आले असून २ पंपांपैकी एकपंप कार्यान्वित आहे. त्यामुळे तासाला ६ लाख लिटर पाणी अतिरिक्त मिळणार आहे. कुपनलिका दुरुस्त करण्यासाठी दोन वेळा निविदा काढुन सुध्दा त्यास प्रतिसाद लाभलेला नाही असे सांगीतले. नगरसेवकांनी व्हॉल्वमन विरुध्द तक्रारी केल्यानंतर उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी तुम्ही लेखी तक्रार द्या कारवाई करतो असे सांगताच नगरसेविका उज्जवला बेंडाळे व आदी नगरसेवकांनी रोष व्यक्त केला. नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी पाण्याची टाकी लिकेज असून त्याकडे दुर्लक्ष असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. नगरसेवक प्रशांत नाईक यांनी वाघुरची जलवाहिनीला गळती असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. लिकेज लहान असल्याने अभियंते दुरुस्ती करत नसल्याने पाण्याची नासाडी होत असल्याचा आरोप केला.    पावताबाई भिल, कुलभूषण पाटील, उज्वला बेंडाळे यांनी देखील पाण्याच्या समस्या मांडून अधिकारी कमचाऱ्यांना धारेवर धरले. महापौरांनी यावर उपाययोजन करुन समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. नगरसेवक गणेश सोनवणे यांनी सुप्रिम कॉलनीपरिसरात १५ दिवसाआड पाणी पुरवठा होत असून प्रशासनाने पाण्याचे टँकर सुध्दा बंद केले असल्याचे निदर्शनास आणले. पाणीपुरवठा अधिकार्‍यांनी सुप्रिम कॉलनीमध्ये ६ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याचे सांगताच नगरसेवक सोनवणे यांनी तुम्ही ६ दिवसाआड पाणी सोडत असल्याचे दाखवा मी राजिनामा देतो असे आव्हान दिले.

सत्ताधाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

मनपा हद्दीतील निमखेडी शिवार, रायसोनी नगर, सुप्रिम कॉलनीसह शहरातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या बिकट आहे. या समस्यांबाबत तक्रार केली असता त्या सुटत नाही. अधिकरी वकर्मचारी फोन उचलत नाही, निमखेडी शिवाक्रच्या समस्येबाबत १५ वेळ पत्र देवूनही समस्या कायम असल्याचे म्हणत ह्या समस्या त्वरीत न सुटल्यास आंदोलनाचा करण्याचा इशारा चंद्रशेखर पाटील यांच्यासह भाजपाच्या इतर सदस्यांनी बैठकीत दिला.