यावल, रावेर, सामाजिक

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत निवेदन ; शेतकरी मोर्चा (व्हिडीओ)

शेअर करा !

nivedan

 

फैजपूर प्रतिनिधी । रावेर-यावल तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आज सकाळी फैजपूर येथे आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोर्चा काढून प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना शेतकाऱ्यांचा मागणीचे निवेदन देण्यात आले.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

परतीच्या पावसाने तालुक्यातील कापणीस आलेले पिकांचे ज्वारी, मका, कापूस, सोयाबीनसारखा पिकांचे अतिपावसामुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आज सकाळी 10.30 वाजता सुभाष चौक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात फसवणीस सरकरचा हाय हाय, फेकू सरकार चले जाव, यासह आधी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणले होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रावेर-यावल भागातील शेतकरी हा आधीच दुष्काळाने त्रस्त झालेला आहे. त्यातच यावर्षी पावसाच्या अतिवृष्टीमुळे सर्व पिके नाहीशी झालेली आहे. जसे ज्वारी, मका कापणीला आली होती तर कापूस वेचणीवर आला होता. मात्र शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. यामुळे आज शेतकरी फारच आर्थिक अडचणीत आलेला आहे. सततच्या नापिकी दुष्काळ, अतिवृष्टी ,चक्रीवादळ, गारपीट यासह अनेक कारणांनी शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दाबला गेला असल्याने पूर्णतः आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना शासनाकडून तात्काळ दुष्काळी मदत मिळावी व शेतकाऱ्यांचा हिताचा योग्य निर्णय सरकारने घ्यावा अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

अशा आहेत शेतकरीबांधवांच्या 14 मागण्या

याचबरोबर शेतकऱ्यांची शेती पंपाचे सर्व थकीत वीजबिल बिल माफ करावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सातबारा वरील पिकपेऱ्या प्रमाणे हेक्टरी रुपये 50 हजार मदत मिळावी, पावसामुळे सर्वच प्रकारचा गुरांचा चारा नष्ट झाल्याने गुरांच्या चाऱ्याची मदत मिळणे, नुकतच शासनाने केळी विम्याची घोषणा केली असून त्याची मुदत 9 नोव्हेंबरपर्यंतची दिलेली आहे. तलाठी व शासकीय यंत्रणा पीक पाहणी करीत असल्याने शेतकऱ्यांना उतारे मिळत नसल्याने केळी पीक विम्याची मुदत वाढ मिळण्याबाबत, रावेर यावल तालुक्यातील मागील वर्षाची दुष्काळ निधी व बोंड अळीचे अद्याप शेतकऱ्यांना वाटप झालेली नसल्याने ते त्वरित वाटप करण्यात यावे, शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच घेताना 45% टक्के ऐवजी 80 टक्‍के पर्यंत अनुदान जाहीर करण्यात यावे, शेतकऱ्यांसोबत शेतमजुरांचा विचार व्हावा व त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी मदतीची तरतूद करण्यात यावी, यासह 14 मागण्यांचे निवेदन यावेळी शेतकऱ्यांनी प्रांतअधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना देण्यात आले.

निवेदनावेळी यांची होती उपस्थिती

यावेळी माजी आ.रमेश चौधरी, माजी आ.अरुण पाटील, रावेर काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, यावल राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा पाटील, यावल पंचायत समिती काँग्रेस गटनेते शेखर पाटील, फैजपूर पालिका प्रभारी नगराध्यक्ष रशीद तडवी, नगरसेवक कलीम मण्यार, देवेंद्र बेंडाळे, राजीव पाटील, डॉ.सुरेश पाटील, प्रल्हाद बोंडे, किशोर पाटील, बापू पाटील, योगेश भंगाळे, रमेश महाजन, लिलाधर चौधरी, केतन किरंगे, चंद्रशेखर चौधरी, रियाज मेंबर, शेख जफर, सुनील कोंडे, डॉ.गणेश चौधरी, रामा चौधरी, डॉ.राजेंद्र पाटील, गोंडू महाजन, माजी नगरसेविका निलिमा किरंगे, प्रभात चौधरी, अजित पाटील, संजीव चौधरी, भागवत पाचपोळ, कदिर खान, रामराव मोरे यासह असंख्य काँग्रेस राष्ट्रवादी व शेतकरी बांधव मोठ्या संख्यने उपस्थीत होते.