क्राईम, भडगाव

खळबळजनक : भडगावात एकाच कुटुंबातील तिघांची सामुहिक आत्महत्या

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट
1529492117 0632
 

भडगाव (प्रतिनिधी) शहरातील एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेत तिघांनी सामुहिक आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून याच परिवारातील ९ वर्षीय बालकाचा मागील आठवड्यातच पाचोरा येथे निर्घृण हत्या झाली होती.

  • vignaharta
  • Online Add I RGB
  • new ad
  • advt tsh 1

 

मागील आठवड्यात ९ वर्षीय बालक सय्यद इसम सय्यद बाबू याचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह पाचोरा रोडवरील राजनीताई देशमुख महाविद्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या केळीच्या शेतात सापडला होता. आज त्याचेच आई,वडील आणि बहिणीने सामूहिक सामूहिक आत्महत्या केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळी नेहमी प्रमाणे हा परिवार उठला नाही. त्यामुळे शेजारच्यांना शंका आली. म्हणून त्यांनी दरवाजा ठोठावून पहिला असता, आतून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी शेजारच्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता,तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेत. त्यानंतर याबाबत तत्काळ पोलिसांना महिती कळविण्यात आली. पोलीस सूत्र मात्र, अद्याप काहीही सांगता येणार नाही,असे म्हणताय. त्यामुळे आत्महत्या की,घातपात? याबाबत शंका उपस्थित होत आहे. दरम्यान, या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली झाली आहे. घरातील दरवाजे अजूनही बंद घटनास्थळी पोलीस उपस्थित चौकशी झाल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल.