आरोग्य, राष्ट्रीय

बिहारमध्ये ‘चमकी बुखार’मुळे ५६ मुलांचा मृत्यू

शेअर करा !
chamki bukhar
 

पाटणा (वृत्तसंस्था) बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात सोमवारपर्यंत ‘चमकी बुखार’ या नावाच्या तापामुळे २५ मुलांचा तर उत्तर बिहारमध्ये ५६ मुलांचा बळी घेतला आहे.

advt tsh 1

 

‘चमकी बुखार’ या तापामुळे पीडित असलेली मुले ४ ते १५ वयोगटातील आहे. या तापाची तीव्रता उत्तर बिहारमधील सीतामढी, शिवहर, मोतिहारी व वैशाली जिल्ह्यांत सर्वाधिक आहे. एईएस (एक्टूड इंसेफेलाइटिस सिंड्रोम) आणि जेई (जपानी इंसेफलाइटिस) असे नाव असलेल्या तापास बिहारमध्ये ‘चमकी बुखार’ म्हणून ओळखतात. दरम्यान, या तापामुळे आजारी असलेली १०० मुले मुजफ्फरपूरच्या श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून रुग्णालय प्रशासन तिसरा कक्ष उघडण्याच्या प्रयत्नात आहे.