क्राईम, जळगाव

साडे पाच लाखांची फसवणूक; पाच जणांवर गुन्हा

शेअर करा !

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । भारतीय स्टेट बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर असलेल्या अधिकाऱ्यानेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बँकेच्या खातेधारकांच्या खात्यातून ५ लाख ४० हजार रुपये काढून घेत फसवणूक व अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत सहाय्यक महाप्रबंधक असलेल्या अशोक विनायकराव सोनवणे यांनी या प्रकरणी चौकशी करुन फिर्याद दिली आहे. बँकेच्या शिवाजीनगर शाखेत सहाय्यक व्यवस्थापक असलेले जयेश रघुनाथ सोनार व कंत्राटी पद्धतीने कामावर असलेले प्रकाश कुळकर्णी, अमरीश मोकाशी, संजीव सोनवणे व सागर पत्की यांनी संगनमत करुन लाभार्थी नसताना देखील ही रक्कम काढून घेतली आहे. त्यांनी करण बागरे, समाधान तील्लोरे व परमवीर आठवले या तीघांच्या खात्यातून ही रक्कम काढून घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणी फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, पुरूषोत्तम वागळे तपास करीत आहेत.