क्रीडा, राज्य, राष्ट्रीय

2020 मध्ये अजिंक्य रहाणे ‘या’ संघातून खेळणार

शेअर करा !

rahane 1

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 2020 मधील सत्रात राजस्थान रॉयल्सचा अजिंक्य रहाणे दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • advt tsh 1
  • Online Add I RGB
  • advt atharva hospital

सूत्रांनी मिळालेली माहिती अशी की, ”रहाणेला संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु हे डील होईल का, हे आताच सांगणे अवघड आहे. या करार होण्यापूर्वी अनेक नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. रहाणे हा राजस्थान संघाचा मोठा खेळाडू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी ते विचार नक्की करतील. मात्र, दोन्ही संघांमध्ये चर्चा सुरू आहेत.” रहाणेला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी दिल्ली संघाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांनी रहाणेला आपल्या संघात घेण्यासाठी राजस्थान संघाशी बोलणी सुरू केली आहे. त्यामुळे 2020च्या आयपीलमध्ये रहाणे दिल्लीकडून खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. ही डील यशस्वी झाल्यास आयपीएलमधील हा मोठा फेरबदल ठरेल.