राजकीय, रावेर

आ.एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून रस्त्यांच्या कामासाठी 17 कोटी मंजूर

शेअर करा !

रावेर (प्रतिनिधी) माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील रावेर तालुक्यासाठी पुल व रस्त्यांच्या कामासाठी 17 कोटीचा निधी मंजूर झाला आहे.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

 

रावेर तालुक्यातील पुल व रस्त्याची कामे व्हावी, अशी नागरीकांकडून मागणी होती. त्यानुसार आमदार एकनाथराव खडसे यांनी पाठपुरावा केला होता. आ.खडसे याबी यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून पुल व रस्त्याच्या कामाचा विशेष दुरुस्ती रस्ते अंतर्गत कामास समावेश करून महाराष्ट्र शासनाकडून मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये तांदलवाडी-गाते-उदळी मार्ग रक्कम 29 लक्ष, रनगाव-दूसखेडा डांबरीकरण 35 लाख, बलवाडी-ऐनपुर रस्ता डांबरीकरण 28 लाख, बलवाडी-विवरे डांबरीकरण 7 कोटी 28 लाख खिरवळ गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम 28 लाख,अशी कामे मंजूर करण्यात आली आहेत.