चोपडा, राज्य, सामाजिक

धुळे येथे १३, १४ जुलैला १० व्या कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन

शेअर करा !

118dec5

चोपडा, प्रतिनिधी | १० व्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे धुळे येथे १३, १४ जुलैला राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांपासून साहित्य संमेलने भरवली जात आहेत. त्यात अनेक अनूभवी व नवोदित साहित्यिक कवी भाग घेत असतात. यानिमित्त दि. १२ जुलै रोजी अण्णाभाऊ लिखित साहित्य ग्रंथांची जत्रा अमळनेर शहरात येणार आहे.

FB IMG 1572779226384

 

१३ जुलै रोजी सकाळ १०.०० वाजता संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रास्ताविक प्राचार्य डॉ.जे.बी. अडसूळ करणार असून भूमिकेची मांडणी ख्यातनाम कामगार नेते डॉ. भालचंद्र कानगो हे करणार आहेत. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ख्यातनाम विचारवंत गोपाल गूरू हे उपस्थित राहणार आहेत तर स्वागताध्यक्ष पूरोगामी विचारवंत विलास वाघ असतील. संमेलनाचे अध्यक्षस्थानी समाजशास्त्रज्ञ प्रा.डॉ. सूकदेव थोरात (जेएनयू, दिल्ली) हे भूषवणार आहेत. या शिवाय प्रा. तानाजी ठोंबरे (बार्शी), डॉ. राम बाहेती (औरंगाबाद), नामदेवराव चव्हाण (बीड), प्रा. राजू देसले (नासिक) आदी अनेक अण्णाभाऊ विचारप्रेमी यावेळी हजर राहणार आहेत. संमेलनात साहित्यिक भाषणे, विचारांची देवाण-घेवाण, पूस्तकांचे प्रकाशन तसेच विविध परिसंवादांचे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात चक्रव्यूहात अडकलेली लोकशाही, जागतिकीकरण व आण्णाभाऊ साठे आणि आण्णाभाऊंचा वर्गसंघर्ष या परिसंवादांचा समावेश आहे.

अधिवेशनाचा समारोप पूरोगामी साहित्यिक व पत्रकार उत्तम कांबळे, उषा वाघ यांच्या व्याख्यानांनी होणार आहे. या संमेलनाने खान्देशातील विचारवंत, साहित्यिक, त्याच प्रमाणे नवोदीत लेखक, कवी, पूरोगामी पोवाडेकार, शायर यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल. तरी जिल्ह्यातील लेखक, कवी आदी संबंधित यांनी आवर्जून हजेरी द्यावी, असे आवाहन जळगाव जिल्हा कॉ. अण्णाभाऊ साठे विचार प्रसारक मंडळाचे कॉ. गोविंद देवरे, किशोर नेवे, पत्रकार बोदडे, अमृतराव महाजन, ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठल बडगुजर, शेखर सोनाळकर, पत्रकार अनिल पालीवाल,  प्रा नारायण कटेकर, रमेश जे. पाटील, फोटोग्राफर वारडे, सूनिल पाटील, संजीव सोनवणे, प्रकाश बोरसे, निर्मला शिंदे, गोरख वानखेडे, कवी राजेंद्र पारे, विजय बाविस्कर, जहूर देशमूख, राजेंद्र गाडगीळ, जे.डी. ठाकरे, पत्रकार डॉ. अय्यूब पिंजारी, संजय बारी, अरूण गायकवाड, लक्ष्मण शिंदे, रावसाहेब धोबी, प्रा. प्रकाश चौधरी, चंद्रकांत माळी, चंद्रकांत साळी, पांडूरंग अवचार आदींनी केले आहे.