भुसावळ, शिक्षण, सामाजिक

भुसावळातील आदर्श हायटेक आयटीआयत प्रशिक्षण शिबिर उत्साहात

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । प्रशिक्षणार्थींनी उद्योजक व स्वयंरोजगाराकडे वळावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए.आर.राजपूत यांनी केले. ते आदर्श हायटेक आयटीआयत पाच दिवसांचे प्रशिक्षण शिबिराच्‍या निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते.

  • advt tsh flats
  • spot sanction insta
  • Sulax 1

यावेळी प्राचार्य राजपूत यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान विकासावर भर देऊन उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन केले. रोजगारासाठी हे शिबिर उपयुक्त असून प्रशिक्षणार्थीना भविष्यात खूप मदत होईल. महिंद्रा कंपनी कडून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच संस्थेच्या आधुनिक तंत्रज्ञान व विकासाभिमुख कार्याचे कौतुक केले.

प्रगती बहुउद्देशीय संस्था संचलित आदर्श हायटेक आयटीआय कुऱ्हे पानाचे येथे २५ नोव्हेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष कैलास महाजन यांच्‍या हस्ते नंदी फाऊंडेशन संचलित महिंद्रा प्राइड कंपनीचे वतीने होणाऱ्या निवासी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

प्रगती बहुउद्देशिय संस्थेतील, आदर्श हायटेक आयटीआय, व रावेर येथील महाजन आयटी आय,एकविरा आयटीआय एरंडोल येथील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले. या पाच दिवसीय निवासी शिबिरात कौशल्य विकास,आधुनिक तंत्रज्ञान, व स्वयरोजगाराच्या विविध विषयावर महिंद्रा प्राइड कंपनीचे तज्ञ चिन्मय अभ्यांग राव, चंचल पवार, दीपक देवकर यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे महेंद्र गवई,संस्थेचे अध्यक्ष कैलास महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. व त्यांनी दरवर्षी अशा आधुनिक तंत्रज्ञान युक्त मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी प्राचार्य एस.कुरेशी, रावेर येथील गट निर्देशक श्री.धांडे व तिन्ही संस्थेचे निर्देशक व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंगेश नरवाडे यांनी तर आभार चेतन वंजारी यांनी मानले.