राष्ट्रीय

भारतीय जवानांनी केला पाकच्या बॅटच्या जवानांचा खात्मा

शेअर करा !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या सीमा सशस्त्र दलाच्या (बॉर्डर अ‍ॅक्शन टीम) जवानांसह पाच दहशतवाद्यांना ठार केले असून या कारवाईची व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.

FB IMG 1572779226384

पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या (बॅट) जवानांसह अतिरेक्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. केरन सेक्टरमधील घुसखोरी डाव भारतीय जवानांनी उधळून लावला. लष्कराने केलेल्या कारवाईत बॅटच्या सैनिकांसह पाच दहशतवादी ठार झाले आहेत. या कारवाईची लष्कराने सोमवारी माहिती दिली. तसेच याचा व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओ पाच जणांचे मृतदेह दिसत आहेत. ही कारवाई ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अर्थात, आधीच ही कारवाई करून नंतर याचा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.