यावल, राजकीय, रावेर, सामाजिक

फैजपूर शहरातील गणपती मंडळांना धनंजय चौधरींची भेट

शेअर करा !

फैजपूर, प्रतिनिधी। माजी आमदार शिरीष चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी यांनी शनिवारी फैजपूर शहरातील गणपती मंडळांना भेटी दिल्या तसेच तरुण युवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे धनंजय चौधरी यांनी सांगितले.

advt tsh 1

आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय रंग चढू लागला आहे यातच गणेशोत्सवाचा काळ असल्याने इच्छुक उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी गावोगावी गणपती मंडळांना भेटी देऊन तसेच तरुणांशी संवाद साधण्याचे काम इच्छुक उमेदवार व त्‍यांचे प्रतिनीधी करत आहे.
यावेळी शहरातील सराफ कॉलनी भागातील मोरया गणेशोत्सव मंडळ तसेच गावातील अनेक गणपती मंडळांना भेटी देऊन गणपतीची आरती करण्यात आली यावेळी धनंजय चौधरी यांना तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला