क्राईम, जळगाव

पाठलाग करून विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा अटकेत

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । शाळा सुटल्यानंतर मू़. जे. महाविद्यालयाच्या मागील बाजूने घरी जात असलेल्या इयत्ता ७वीच्या विद्यार्थिनीचा दुचाकीस्वार प्रौढाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी १ वाजता घडली. रामानंदनगर पोलिसांनी तपासचक्र फिरवित प्रौढाला अटक केली.

  • spot sanction insta
  • Sulax 1
  • advt tsh flats

असून अनिल लोटन ईशी (वय-४६, रा़ खोटेनगर) असे संशयिताचे नाव आहे़. शहरातील मु.जे. महाविद्यालय परिसरातील एका शाळेमध्ये इयत्ता ७ वीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थिनी मंगळवार, ३ रोजी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाली. १ वाजेच्या सुमारा महाविद्यालयाच्या मागील बाजूच्या रस्त्याने जात असताना दुचाकीवरून एक प्रौढ आला व त्याने विद्यार्थिनीसह तिच्या सोबतच्या मैत्रीणींची विचारपूस केली. नंतर ती विद्यार्थिनी काही अंतर पुढे गेल्यानंतर त्या प्रौढाने तिचा पाठलाग करून तिला थांबविले व विनयभंग केला. हा प्रकार जवळच असलेल्या एका व्यक्तीला दिसून आल्यानंतर त्यांनी त्या प्रौढास शिवीगाळ केली. त्यानंतर तो प्रौधने काढता पाय घेतला. घरी आल्यानंतर विद्यार्थिनीने वडीलांना संपूर्ण हकीकत सांगितल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात त्या प्रौढाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़

सीसीटीव्ही फुटले व दुचाकी क्रमांकावरून पटली ओळख
रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताचा शोध पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरिक्षक कांचन काळे, प्रदीप चौधरी, शरद पाटील यांनी विनयभंग करणाºया प्रौढाचा शोध घेण्यास सुरूवात केली़ यावेळी सीसीटीव्ही फुटेज तपासले़ त्यात दुचाकी क्रमांक मिळाल्यानंतर संशयिताची ओळख पटली. व दुचाकी क्रमांकावरून अनिल लोटन ईशी असे त्या प्रौढाचे नाव असल्याचे समोर आले.

खोटेनगरातून केली अटक
नाव व पत्ता मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्यातील प्रदीप चौधरी, विजय जाधव शरद पाटील यांनी क्षणाचा विलंब न करता खोटेनगर येथून संशयित अनिल ईशी यास अटक केली़ पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक कांचन काळे या करित आहेत़