क्राईम, जळगाव

जळगावात माजी नगरसेवकाचे घर फोडले ; रोकड लांबवली

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट
chor
 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अशोकनगर भागात माजी नगरसेवक प्रदीप रोटे यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे याच परिसरात आणखी एकठिकाणी घरफोडी झाली आहे. परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • Online Add I RGB
  • new ad
  • vignaharta
  • advt tsh 1
  • advt atharva hospital

 

या संदर्भात अधिक असे की, माजी नगरसेवक प्रदीप रोटे यांचे दोन मजली घर आहे. काल रात्री नेहमीप्रमाणे ते जेवण केल्यानंतर परिवारातील सर्व सदस्यांसह दुसर्‍या मजल्यावर विश्रांतीसाठी गेले. चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटात असलेले रोख ७ हजार रूपये पळविले. याबाबत प्रदीप रोटे यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दिली आहे. या घरफोडीतील चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्‍वान पथकाला पाचारण केले होते. एकाच भागात दोन ठिकाणी चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.