क्रीडा, चोपडा

तबला वादन विशारद परीक्षेत आदिती शिंपी राज्यात प्रथम

शेअर करा !

चोपडा(प्रतिनिधी) | येथील विवेकानंद विद्यालयाची माजी विद्यार्थिनी व विद्यालयाचे क्रीडाशिक्षक अनिल गंगाधर शिंपी यांची कन्या आदिती शिंपी ही अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे एप्रिल 2018 या सत्रात घेण्यात आलेल्या तबला वादन विशारद पूर्ण परीक्षेत महाराष्ट्रात सर्वाधिक मार्क्स मिळून मंडळाचे नऊ पुरस्कार प्राप्त करत महाराष्ट्र राज्यात सर्व प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

मुंबई येथील कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक सुरेशदादा तळवलकर, गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रभाकर भांडारे व विकास कशाळकर यांच्या शुभहस्ते अदितीला पुरस्कार देण्यात आला. खान्देशाला संगीत क्षेत्रातला हा खूप मोठा सन्मान आदितीने मिळवूनदिला त्याबद्दल सर्वत्र आदिती चे कौतुक होत आहे. आदितीला चोपड्याचे संगीत शिक्षक वसंत मयूर यांच्याकडून तबलावादनाचे शिक्षण मिळत आहे.

तिच्या यशाबद्दल माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्यासोबतच संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर,उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या समवेत सर्वशिक्षकवृंद विद्यार्थी व पालकवृंद यांच्यातर्फे अभिनंदन व कौतुक होत आहे.