व्यापार

अ‍ॅमवेची हर्बल टुथपेस्ट बाजारपेठेत दाखल

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

मुंबई प्रतिनिधी । अ‍ॅमवे इंडिया या ख्यातप्राप्त कंपनीने आता ग्लिस्टर या नावाने हर्बल टुथपेस्ट बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

Akshay Trutiya

ग्लिस्टर या टुथपेस्टच्या माध्यमातून अ‍ॅमवे कंपनीने हर्बल ओरल केअर बाजारपेठेमध्ये प्रवेश केला आहे. यात अनेक औषधी वनस्पती घटकांसोबतच उत्तम चव व आल्हाददायी रंगाचे मिश्रण आहे. ग्लिस्टर हर्बल्सच्या सादरीकरणाची घोषणा करत मवे इंडियाचे प्रमुख विपणन अधिकारी संदीप शाह म्हणाले, ग्लिस्टर हा जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅण्ड्सपैकी एक आहे. पाच दशकांहून अधिक काळापासून सर्वाधिक विक्री झालेल्या या ब्रॅण्डने जगभरातील लाखो ग्राहकांचा विश्‍वास जिंकला आहे आणि त्यांच्या नेहमीच्या ओरल हायजीन नित्यक्रमाचा भाग राहिला आहे. उच्च दर्जाची उत्पादने देण्याची आमची कटिबद्धता कायम राखत आणि दीर्घकालीन आरोग्यदायी जीवनासाठी नैसर्गिक व औषधी वनस्पती पर्यायांसाठी होत असलेल्या वाढत्या मागण्यांची पूर्तता करत ग्लिस्टर हर्बल्स हे आमच्या प्रमुख ब्रॅण्डचे विस्तारीकरण आहे. हा ब्रॅण्ड आमच्या भारतीय ग्राहकांसाठी देशातच तयार करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.